[aurangabad-maharashtra] - पैठणमध्ये २३ कोटींची कामे; रविवारी भूमिपूजन

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, पैठण

विविध योजनेअंतर्गत शहरात २३ कोटींच्या विकास कामांना सुरुवात होणार असून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा हस्ते रविवारी (१७ फेब्रुवारी) भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी दिली.

स्टेट बँक ऑफ इंडिया ते नेहरू चौक, गागाभट्ट चौक ते बौद्ध विहार, डॉ. लोंढे हॉस्पिटल ते नवीन तहसील रोड हे सिमेंट रस्ते, विविध प्रभागातील सिमेंट रस्ते व सुशोभीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार संदीपान भुमरे, आमदार अतुल सावे, भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी लोळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपनगराध्यक्षा सुचित्रा जोशी, गटनेते आबा बरकसे, तुषार पाटील, कल्याण भुकेले, अजित पगारे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, उपमुख्याधिकारी चौधरी व नगरसेवकांनी केले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/LG58CAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬