[aurangabad-maharashtra] - समर्थनगर चोरी; दोघांच्या कोठडीत वाढ

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगरातील व्यंकटेश अपार्टमेंटमध्ये भरदिवसा फ्लॅटचे लॉक तोडून २४ तोळे सोन्यांसह एक लाखांची रोकड चोरल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी किशोर तेजराव वायाळ व राजू शिवाजी इंगळे यांच्या पोलिस कोठडीत शनिवारपर्यंत (१६ फेब्रुवारी) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) दिले.

अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला असलेल्या सुनीता धर्मेंद्र पुराणिक (वय ३८) यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना चार फेब्रुवारी रोजी झाली आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी किशोर तेजराव वायाळ (३८, रा. मेहरा. ता. चिखली, जि. बुलढाणा) व राजू शिवाजी इंगळे (२४, रा. बाराई, ता. मेहकर, जि. बुलढाणा) या दोघांना ९ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांच्या कोठीडीची मुदत संपल्याने त्यांना कोर्टात हजर केले असता, आरोपींच्या ताब्यातून सात लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून उर्वरित दागिने व एक लाख रुपयांची रोख जप्त करणे बाकी आहे. आरोपी इंगळे याने गुन्ह्यातील सोन्याचे दागिने बुलढाणा व मेहकर भागात विक्री केल्याची सांगितले असून त्याचा तपास करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करावयाचा आहे. आरोपींचे आणखी साथीदार असून त्याचा तपास करुन त्यांना अटक करणे असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/44zaewAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬