[jalgaon] - जळगावात शिक्षकास मारहाण

  |   Jalgaonnews

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आर. आर. विद्यालयातील शिक्षकाला दोन तरुणांनी फायटरने मारहाण केली. यात शिक्षक गंभीर जखमी झाले. इंडो-अमेरिकन हास्पिटलच्या रस्त्यावर गरुवारी दुपारी ही घटना घडली. गिरीश रमणलाल भावसार (वय ४५ रा. निवृत्तीनगर) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांच्या नाकाचे हाड तुटले आहे.

गिरीश भावसार हे आर. आर. विद्यालयात माध्यमिकचे शिक्षक आहेत. आठवी व दहावीच्या वर्गाला समाजशास्त्र विषय शिकवितात. खोटेनगर परिसरातील निवृत्तीनगरात ते राहतात. शाळा सुटल्यानंतर दुपारी ते विद्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. विद्यालयाकडून जुन्या इंडो-अमेरिकन हॉस्पिटलकडून जात असलेल्या रस्त्यावर महेश भोळे फूल भांडारजवळ दोन तरुण त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करीत आले. एकाने अचानकच त्यांचा डावा हात धरला, त्याचवेळी त्याच्या तोंडावर फायटर घातलेल्या हाताला मारहाण केली. यात दुचाकीवरुन तोल जावून भावसार खाली पडले. नागरिकांनी धाव घेत त्यांची दुचाकी उचलली व त्यांना त बाजूला बसविले. मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून नाकाचे हाड मोडले आहे....

फोटो - http://v.duta.us/HRnofgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fdSD0QAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬