[kolhapur] - आधी पार्किंग पट्टे नंतर डांबरीकरण

  |   Kolhapurnews

महानगरपालिका चौकातील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या चौकात प्रजासत्ताक दिनापूर्वी अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी पार्किंग पट्टे मारले. पण अ‌वघ्या काही दिवसांत पार्किंग पट्ट्यावर डांबरीकरण केले. डांबरीकरणामुळे पट्टे गायब झाले असून पुन्हा पार्किंगचे पट्टे मारावे लागणार आहे. पण डांबरीकणापूर्वी मारलेल्या पट्ट्यांचे बिल काढण्यासाठी फाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टेबलवर पोहोचली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कामामुळे एकच काम दोनवेळा करावे लागणार असून त्यामुळे महापालिकेचा पैसा वाया गेला आहे.

महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या चौकात महापौर, आयुक्त यांच्यासह अन्य समितीच्या पदाधिकाऱ्यांची वाहने पार्किंग केली जातात. महापौर व आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या जिन्याजवळ वाहने पार्क केली जातात. त्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांची वाहने पार्किंग केली जातात. त्यासाठी चौकात पार्किंगचे पट्टे मारले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वाहतूक विभागाकडून महापालिकेच्या रंगकाम ठेकेदारांकडून पट्टे मारुन घेण्यात आले. पट्टे मारुन जेमतेम सात दिवसांचा अवधी झाल्यानंतर चौकात डांबरीकरण करण्यात आले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fVEYYgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬