[kolhapur] - आरटीईतंर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया

  |   Kolhapurnews

कोल्हापूर: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम अंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी २५ टक्के पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवण्याची तरतूद आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी १४ व १५ मे याकालावधीत लॉटरी काढण्यात येणार आहे. वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटित तसेच विधवा महिला या घटकातील पालकांकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी २५ फेब्रुवारी ते ११ मार्च आहे. जिल्ह्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंसहायित शाळांनी ऑनलाइन नोंदी करावी व पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केला आहे. http://v.duta.us/_JTiqgAA. या वेबसाइटवरील RTE पोट्रल या लिंकवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4M1OjAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬