[kolhapur] - इस्लामपूरः वाळव्यातील आगीत २५ घरे खाक

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा,

'पाल्याच्या घरावर वावटूळ' या ग्रामीण मराठी म्हणीचा तंतोतंत प्रत्यय आज वाळवा येथे आला. हातावरचे पोट असणाऱ्या २५ मजुरांचे संसार आज आगीच्या भक्षस्थानी पडले. वाळवा येथील श्रमिकनगर वसाहतीतील शेतमजुरांच्या झोपड्यांना आग लागून सहा गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही. मात्र सर्व कुटुंबांचे प्रापंचिक साहित्य, कपडालत्ता, सोनेनाणे, रोख रक्कम आगीच्या भक्षस्थानी पडली. आगीत सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक युवक आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी साडेतीन ते चार तासानंतर आग आटोक्यात आणली. आगीने या २५ कुटुंबांचे होत्याचे नव्हते केले.

वाळवा येथील श्रमिकनगर (बाराबिघा) परिसरात रोजंदारी करणारी कुटुंबे वास्तव्याला आहेत. सध्या द्राक्षाचा सीझन असल्याने नेहमीप्रमाणे येथील लोक सकाळी द्राक्षबागेत कामावर गेले होते. सकाळी साडेदहा वाजता गंगाराम लक्ष्मण यमगर व लक्ष्मण मायाप्पा यमगर यांच्या घरापासून आगीला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. गॅस गळतीमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे. मजुरांची वस्ती असल्याने एकमेकाला लागून छोटी-छोटी घरे, काही पक्क्या विटांची तर काही पाल्याच्या भितींची घरे आहेत. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. पाठोपाठ सिलेंडरचे स्फोट होवू लागले. आगीने थैमान घातले. पत्र्याची, पाल्याने झाकलेली घरे असल्यामुळे आग पसरत गेली. यात सर्व प्रापंचिक साहित्य, कपडालत्ता, धान्य, सोने-नाणे आणि बरेच काही जळून खाक झाले....

फोटो - http://v.duta.us/pXzhGwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bYHfHgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬