[kolhapur] - कोल्हापूरच्या चळवळींत शिवाजी पेठेचे मोठे योगदान

  |   Kolhapurnews

'कोल्हापूरच्या सामाजिक आंदोलनात व चळवळीत शिवाजी पेठेचे योगदान मोठे आहे. करवीर नगरीचा स्वाभिमान आणि शहराचा अंगार अशी पेठेची ओळख आहे. नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पेठेतील नागरिकांनी सातत्याने केलेला उठाव वाखाणण्याजोगा आहे' असे कौतुकोद्गार आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त उभारलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे व स्वागत कमानीचे उद्घाटन गुरुवारी रात्री झाले. याप्रसंगी आयोजित समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

शिवाजी पेठेतील विविध तालीम संस्था, संघटनेच्या प्रतिनिधीनी व नागरिकांनी गर्दी केली होती. उभा मारुती चौक येथे कार्यक्रम झाला.याप्रसंगी मंडळातर्फे कोल्हापूर शहर शिवसेनाप्रमुखपदी निवड झाल्याबद्ददल रविकिरण इंगवले यांचा सत्कार झाला. दरम्यान मंडळातर्फे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गंगावेशपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली....

फोटो - http://v.duta.us/Jz68wQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/F0wGVwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬