[kolhapur] - कोल्हापूरः एफआरपीने साखरेची कोंडी

  |   Kolhapurnews

एकरकमी प्रश्नावर कारखानदार व शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. कोंडी फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई सुरू केली असताना उर्वरित एफआरपी रकमेपोटी साखरेची मागणी केली आहे, तर कारखान्यांकडून मिळालेल्या साखरेचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. राज्य सरकारकडूनही एफआरपीप्रश्नी हस्तक्षेप होत नसल्याने ग्रामीण भागात एफआरपीवरून पुन्हा भडका उडण्याची चिन्हे वर्तविली जात आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्यानंतर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईच्या धसक्याने कारखानदारांनी पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २३०० रुपये जमा केले. उर्वरित एफआरपी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कारखानदारांनी केली, पण सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने उर्वरित एफआरपीच्या रकमेची साखर शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी स्वाभिमानीने केली....

फोटो - http://v.duta.us/5p7CDAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Xr8StQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬