[kolhapur] - थकबाकीधारकांचा वीज पुरवठा खंडीत होणार

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर जिल्ह्यातील थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये सातत्य नाही. वीजबिल दरमहा थकीत ठेवण्याची मानसिकता मानसिकता बदलण्यासाठी घरगुती, वाणिज्य व औद्योगिक थकबाकीधारकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची व वसुलीची मोहिम आक्रमपणे राबवावी,' अशी सूचना महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी केली.

महावितरणतर्फे आयोजित कार्यक्रमात ताकसांडे यांनी कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीच्या सभागृहात जनमित्र, अभियंते व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ताकसांडे म्हणाले, 'तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार वीजेचा अनधिकृत वापर करीत असल्याचे आढळल्यास तत्काळ फौजदारी करावी. जिल्ह्यातील घरगुती, वाणिय आणि औद्योगिक वर्गवारीतील दोन लाख, २७ हजार थकबाकीधारकांकडून १६ कोटी सात लाख रुपयांच्या वसुलीसाठी मोहीम सुरू आहे.

मात्र कारवाईत सातत्य नसल्यामुळे थकबाकी वाढत आहे. कोणत्याही परिस्थितीत महावितरणचा एक रुपयाही थकीत ठेवू नये. वीजमीटर सुस्थितीत असतानाही प्रत्यक्ष बिलिंगमध्ये कमी वीजवापराची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण थकबाकी याच महिन्यात वसूल करावी,' असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल भोसले, महाव्यवस्थापक अलोक गांगुर्डे, कार्यकारी अभियंता गौतम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/dj7QJwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬