[kolhapur] - दिल्लीत यंदाही शिवजयंती सोहळा

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवी दिल्ली येथे यंदाही मोठ्या स्वरुपात शिवजयंती साजरी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरात मर्यादित न ठेवता तो पूर्ण राष्ट्राचा उत्सव झाला पाहिजे हा उद्देश ठेवून १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने दिली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सदनात सकाळी ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. सकाळी १०.१० मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा आहे. नंतर नवीन महाराष्ट्र सदन ते इंदिरा गांधी कला केंद्रापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन दिल्लीकरांना घडविण्यात येणार आहे. सुमारे ३०० वारकरी, पोवाडे, ध्वज पथक, ढोल ताशा पथक, हलगी पथक, धनगरी ढोल, लेझीम पथक, वासुदेव, गोंधळी अशा अनेक पारंपरिक वाद्यांचा गजर होणार आहे. त्याचबरोबर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके होणार आहेत. तर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन व खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता मुख्य कार्यक्रम आहे. दरम्यान, १७ फेब्रुवारीला महाराष्ट्र सदन येथे दुपारी तीन वाजता 'शक्ती, शौर्य और संस्कार का महोत्सव शिवजन्म राष्ट्रोत्सव' या विषयावर काव्य मैफल होईल....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/R8F-ogAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬