[kolhapur] - मॉरिशसची पूर्वशा मराठीच्या प्रेमात

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी विषयाची शिक्षिका होण्याचे स्वप्न. त्यातून ती बालपणापासून मराठीच्या प्रेमात पडली. बारावीच्या परीक्षेत तिने मराठीत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे मॉरिशस सरकारने तिला महाराष्ट्रात तीन वर्षे मराठी शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. महावीर महाविद्यालयात ती वर्षभरापासून बी. ए.च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. ती आता मराठी बोलते, लिहिते आणि भाषणही करू शकते. पूर्वशा सांतराम सखू असे तिचे नाव.

पूर्वशाचे पूर्वज साताऱ्याचे. इंग्रज राजवटीत ते मॉरिशसमधील ब्लॅकरिव्हर शहरात स्थलांतरीत झाले. तिचे वडील हॉटेल मॅनेजर आहेत. आई शांताबाई गृहिणी आहेत. मॉरिशसमध्ये महाराष्ट्रातून गेलेली अनेक कुटुंबे मराठीतच बोलतात. त्यातून पूर्वशाला मराठीची गोडी लागली. पहिलीपासून पर्यायी विषयात तिने मराठीची निवड केली. ती लिहायला शिकली. पूर्वशाची मातृभाषा क्रेओल. शिक्षण इंग्रजीत. घरी कोणीही मराठी बोलत नाही. परिणामी तिला मराठी बोलता येत नव्हते. तरीही तिने मन लावून अभ्यास केल्याने बारावीच्या परीक्षेत तिने देशपातळीवर मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवला. तिची मराठीबद्दलची ओढ वाढली. मॉरिशसमध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालयांत नोकरीच्या संधी असल्याने तिने मराठी विषयातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आणि तिला तीन वर्षांसाठीची शिष्यवृत्ती सरकारने मंजूर केली....

फोटो - http://v.duta.us/rrSbQQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/FcGNjwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬