[maharashtra] - धक्कादायक, सुंदर दिसत नसल्याने महिलेची आत्महत्या

  |   Maharashtranews

नाशिक : धक्कादायक बातमी नाशिकमधून. सुंदर दिसत नाही, या कराणामुळे एका महिलेने आत्महत्या केली आहे. या विचित्र कारणामुळे आत्महत्या करण्याची ही नाशिकमधली पंधरा दिवसांतली दुसरी घटना आहे. सुंदर मी होणार या नादाने अक्षरशः वेड लावले की काय, असा प्रश्न आहे. कारण चेहऱ्यावरचा मेकअप टिकत नाही, आणि सुंदर दिसत नाही, म्हणून नाशिकमध्ये एका विवाहितेनं चक्क आत्महत्या केलीय.

नाशिकमधल्या विचित्र आत्महत्येची ही दुसरी घटना. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये वाईट स्वप्न पडत असल्यानं एका महिलेनं आत्महत्या केली होती. हे सगळे प्रकार नैराश्यातून घडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नाशिकमधल्या आत्महत्या वाढल्यायेत. त्यातही तरुणांच्या आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे. भलत्या सलत्या कारणासाठी जीवन संपवू नका. चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं असणं जास्त छान आहे.

फोटो - http://v.duta.us/aY-FRAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pygZmAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬