[maharashtra] - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, एकाचा अपघाती मृत्यू

  |   Maharashtranews

नितेश महाजन, झी मीडिया, बुलडाणा : जम्मू - काश्मीरच्या अवंतीपोरा (Awantipora) भागाजवळ गोरीपोरामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी आत्मघाती हल्ला (Suicidal Attack) जालाय. हा हल्ला सीआरपीएफ (CRPF) च्या वाहनांना निशाण्यावर घेत आयईडी स्फोटच्या (IED Blast) साहाय्यानं हा हल्ला घडवून आणण्यात आला. हा हल्ला झाला तेव्हा जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे रवाना जात होता. न्यूज एजन्सी राऊटर्सनं (Reuters) दिलेल्या माहितीनुसार, या हल्लात आत्तापर्यंत ४४ जवानांचा मृत्यू झालाय. या हल्ल्याचा एक व्हिडिओही जैश ए मोहम्मदकडून जारी करण्यात आलाय. पुलवामाच्या दहशतवादी हल्यातील शहिदांमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांचा समावेश असल्याचं समजतंय. याअगोदर सांगली जिल्ह्यातील जवान राहुल कारंडे शहीद झाल्याची माहिती हाती आलीय.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरपांगरा गावचे नितीन शिवाजी राठोड हेदेखील या हल्ल्यात शहीद झालेत. नितीन राठोड यांच्या पश्चात पत्नी वंदना राठोड, मुलगा जीवन, मुलगी जीविका, आई सावित्रीबाई राठोड, वडील शिवाजी राठोड, भाऊ प्रवीण आणि दोन बहिणी असा परिवार आहे....

फोटो - http://v.duta.us/n456KAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2omrRAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬