[mumbai] - कलाप्रदर्शनात ५५ दिग्गजांकडून कला शिकण्याची संधी

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या प्रांगणात होणारे वार्षिक कलाप्रदर्शन हा विविध कला महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसह रसिकांच्याही आकर्षणाचा विषय असतो. मात्र यंदा या प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्यांनीही चित्र, प्रिंट मेकिंग आणि शिल्प ही कला शिकता येणार आहे. ललित कला अकादमीचे राष्ट्रीय शिबीर या प्रदर्शन कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार असून यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५५ कलाकारांशी सामान्यांना थेट संवाद साधता येणार आहे. हे कलाकार विद्यार्थी आणि सामान्यांसाठी कार्यशाळा घेणार आहेत. राज्यात अशा प्रकारे तीनही कार्यशाळा पहिल्यांदाच एकत्रित आयोजित करण्यात आल्या आहेत.

कलेची भाषा सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांनी कला समजून घेण्यासाठी कला पाहावी, आपल्याला ती कला जमू शकते का याचा शोध घ्यावा, त्यासंदर्भात शंका विचाराव्या असा यामागचा हेतू आहे. यामध्ये जगन्नाथ पांडा, वीर मुंशी, प्रा. वसंत सोनवणी, रवी मंडलिक, प्रमोद रामटेके, रवींद्र साळवे, शुभा गोखले, राज मोरे, दत्तात्रय आपेट, नागदास, विजय बागोडी असे दिग्गज कलाकार सामील होणार आहेत. या कार्यशाळा २२ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून २८ फेब्रुवारीपर्यंत चालतील....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/X70ACQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬