[mumbai] - ड्रग्ज विकणाऱ्यांची धरपकड चालूच

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबई पोलिस आणि अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत ड्रग्ज विकणाऱ्यांची धरपकड चालूच ठेवली असून गुरुवारी कुर्ला येथून सहा लाखांचे एमडी आणि अंधेरी येथे अडीच लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या दोन्ही प्रकरणांत दोघाजणांना अटक करण्यात आली आहे.

कुर्ला पश्चिमेकडील सर्वेश्वर मंदिराजवळ एक व्यक्ती ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटचे पोलिस निरीक्षक शशांक शेळके यांना मिळाली. उपनिरीक्षक चारू चव्हाण यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून हसन अली सुभान अली शेख याला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे सहा लाखांचे एमडी ड्रग्ज सापडले. तर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या पथकाने अंधेरीच्या गावदेवी परिसरातून लियाकत ऊर्फ कालू करीम अब्दुल शेख याला अटक केली. त्याच्याकडून अडीच लाखांचे एमडी हस्तगत करण्यात आले. हे ड्रग्ज त्यांनी आणले कुठून याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YNP0AAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬