[mumbai] - पालिका रुग्णवाहिकांचा तिजोरीवर भार

  |   Mumbainews

प्रति किमी खर्च...

सरकारी रुग्णवाहिका : ११७ रु.

पालिका रुग्णवाहिका : ४०० ते ४५० रु.

@nitinchavanMT

मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांसाठी १० कोटी रुपयांच्या रुग्णवाहिका भाड्याने घेण्याचा निर्णय वाजवी दरातच असल्याचा दावा करत स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केला असला तरी राज्य सरकारमार्फत भाड्याने घेतल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकांच्या तुलनेत पालिकेच्या रुग्णवाहिका महागच असल्याचे उघडकीस आले आहे. राज्य सरकारच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका प्रति किमी ११७ रुपये दराने मिळत असताना पालिका मात्र एका रुग्णवाहिकेसाठी प्रति किमी तब्बल ४०० ते ४५० रुपये मोजणार असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

पालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी दोन वर्षांच्या भाडेतत्त्वावर ९ कोटी ९६ लाख रु.पये खर्च करून २३ रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. १८ साध्या आणि पाच कार्डियाक रुग्णवाहिकांचा त्यामध्ये समावेश आहे. पालिका भाडेतत्त्वावर घेत असलेल्या रुग्णवाहिका महाग असून त्यातून कंत्राटदार पालिकेची लूट करत असल्याचा आक्षेप शिवसेनावगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीत केला होता. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला असता दोन वेळा तो फेटाळून लावण्यात आला होता. मात्र नगरसेवकांच्या हरकतीनंतरही हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uSG74wAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬