[mumbai] - बेस्ट बसचे 'फिरते शौचालय' अमान्य

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

बेस्ट बस म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. बेस्ट संपादरम्यान मुंबईकरांना आपल्या लाडक्या व निकडीच्या बसची अधिकच उणीव भासली. अशाच बेस्टमधील भंगारात गेलेल्या बसचा फिरत्या शौचालयांसाठी वापर करण्याची सूचना पुढे आली आणि केवळ प्रवाशांमध्येच नाही तर, महापालिकेच्या नगरसेवकांमध्येही अस्वस्थता पसरली. बेस्टच्या वैभवाचा व प्रतिष्ठेचा मुद्दा मांडत अखेर गुरुवारी ही कल्पना अव्हेरण्यात आली.

मुंबईत अजूनही सार्वजनिक प्रसाधनगृहांची संख्या अपुरी आहे. त्यामुळेच शहरात स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच बेस्टच्या भंगारातील १० बसचे रूपांतर फिरत्या स्वच्छतागृहात करण्याची मागणी शिवसेनेचे शिवडीतील नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिकेत ठरावाची सूचना मांडून केली. 'पश्चिम-पूर्व द्रूतगती महामार्गांवर शौचालयांअभावी प्रवाशांची अडचण होते. तसेच या भागातील रहिवाशांनाही समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे या भागात भंगारातील बसगाड्यांचे रूपांतर फिरत्या स्वच्छतागृहात करावे', अशी सूचना त्यांनी मांडली. मात्र, मुंबईकरांच्या लाडक्या बसचा असा वापर नको, असे मत गुरुवारी नगरसेवकांनी व्यक्त केले....

फोटो - http://v.duta.us/02sI1wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7t6e_wAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬