[mumbai] - युतीमधील विघ्न दूर झाल्याचे संकेत

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपमध्ये युती होणार की नाही याबद्दल मागील काही दिवसांमध्ये शंकाकुशंका उपस्थित केल्या जात असताना आणि युती तुटणार असल्याच्या वावड्या उठत असताना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी रात्री 'मातोश्री' गाठली. जवळपास दीड तासांची बैठक झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्ट करून युतीमधील विघ्न दूर झाले असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले.

रात्री ८.१५च्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा वांद्रे येथील 'मातोश्री' बंगल्यावर पोहोचला. त्यानंतर भाजपतर्फे मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच अन्य नेते यांच्यात बैठक झाली. युतीच्या प्रश्नावर दोन्ही बाजूंनी वेगवेगळी विधाने होत असताना आणि युतीच्या प्रश्नावर तर्क-वितर्क लढवले जात असताना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वांमध्येच थेट बैठक का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर, सध्या सुरू असलेला घोळ संपवण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये ही बैठक झाल्याने युती होण्याच्या दृष्टीने सकारात्मक घडामोडी सुरू झाल्याचे संकेत मानले जात आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/449icwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬