[mumbai] - वजन कमी करण्याचा ‘बेरिअॅट्रिक’ पर्याय

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

तीस वर्षांच्या पोलिस कॉन्स्टेबल रूपाली कदम यांनी अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र, बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारल्याने रूपाली कदम यांना वजन कमी करण्याचे लक्ष्य गाठता आले असून, अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांतूनही त्यांची सुटका होणार आहे.

दहिसर येथे राहणाऱ्या रूपाली कदम यांची काही दिवसांपूर्वी नागपाडा पोलिस रुग्णालयात झालेल्या आरोग्य तपासणीमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या पायाला सूज होती, हायपोथायरॉईड तसेच मेटाबोलिक सिन्ड्रोमचीही लक्षणे दिसून येत होती. त्यांचा बॉडी मास इंडेक्सही ४७.५ इतका होता. त्यामुळे वजन कमी न केल्यास त्यांना विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी भेडसावणार हे डॉक्टरांनी सांगितले होते. म्हणूनच रूपाली यांनी बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारला, असे ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. मुजफ्फल लकडावाला यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zwBb3QAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬