[mumbai] - 'संपकाळातील वेतन कापू नका'

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

बेस्ट प्रशासनाने जानेवारीमधील कर्मचारी संपातील नऊ दिवसांचा पगार कापल्याने गदारोळ निर्माण झाला आहे. संपानंतरच्या पहिल्याच पगारात वाढ झाल्याच्या आनंदात संपातील नऊ दिवसांच्या पगारकपातीचा मिठाचा खडा पडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गुरुवारच्या बेस्ट समिती बैठकीतही पगार कपातीवरून चर्चेचे मोहोळ उठले. बेस्ट कर्मचाऱ्यांचे कमी पगार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेली एकसदस्यीय समिती, पगार कापताना प्रशासनाने बेस्ट समितीस अंधारात ठेवणे, आदी मुद्द्यांवरून समितीची बैठक गाजली. त्यावर बेस्ट समिती अध्यक्ष्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार न कापण्यासह या तिढ्यातून मार्ग काढण्याची सूचना केली.

बेस्टमधील सुमारे ४२ हजार कर्मचारी पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी जानेवारीमध्ये संपावर गेले होते. हा संप मागे घेतल्यानंतर संपाच्या नऊ दिवसांच्या कालावधीतील पगार कापला जाणार नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु, फेब्रुवारीच्या महिन्यात जानेवारीच्या पगाराची स्लीप हाती येताच त्यात पगार वाढल्याचे स्पष्ट झाले. पण संप कालावधीत नऊ दिवसांचा पगार कापल्याचेही आढळून आल्याने कर्मचारी खट्टू झाले आहेत. बेस्ट प्रशासनाच्या कारवाईने अनभिज्ञ असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याचा धक्का बसला. या सर्व घडामोडींचे पडसाद बेस्ट समिती बैठकीतही उमटले....

फोटो - http://v.duta.us/FP1InQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/j8o2TgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬