[mumbai] - mumbai blast: मुंबई बॉम्बस्फोटातील संशयीत अबु बकर अटकेत

  |   Mumbainews

मुंबई

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी स्फोटके पोहोचवणारा ५१ वर्षीय फरार आरोपी अबु बकर याला सौदी अरबमध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अबुला पकडण्यात आले आहे. लवकरच त्याला भारतात आणले जाणार आहे. मुंबईचा रहिवासी असलेल्या अबु बकर अब्दुल गफूर याने बॉम्बस्फोटांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये इतर अनेक लोकांसोबत स्फोटके आणि हत्यारे चालवण्याचे कथित प्रशिक्षण घेतले होते.

दरम्यान, अबु बकर याला सौदी अरबमध्ये झालेली अटक ही बॉम्बस्फोट प्रकरणी नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तपासादरम्यान त्याचे नाव वगळण्यात आले होते. इतर आरोपींनी दिलेल्या जबाबातूनही त्याचे नाव वगळण्यात आले होते. सीबीआयने नोव्हेंबर १९९७मध्ये रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. इंटरपोलनेही नोटीस जारी करत देशातील, तसेच जगभरातील सुरक्षा यंत्रणांना अबु बकरबाबत सावध केले होते. त्याला अटक करण्याचे आदेशही दिले होते....

फोटो - http://v.duta.us/WS0FTwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VIuqYwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬