[mumbai] - Uddhav Thackeray: 'आता पाकिस्तानातच घुसावं लागेल'

  |   Mumbainews

मुंबई:

'पुलवामामधील हल्ला हा केवळ दहशतवादी हल्ला नसून आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा हल्ला आहे. संपूर्ण देश बदला घेण्याची मागणी करतोय. आता केवळ तोंडाच्या वाफा दवडून चालणार नाही. सर्जिकल स्ट्राइक फक्त पाकव्याप्त काश्मीरपर्यंत होता. पण आता पाकिस्तानातच घुसावं लागेल,' अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'देशामध्ये उद्वेग आहे. चीड आहे. निषेध करतो आणि पुन्हा कामाला लागतो असं चालणार नाही. आता सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. संपूर्ण देश सरकारच्या मागे आहे. निवडणुकीचा प्रचार बाजूला राहू द्या आणि पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या,' अशी मागणी उद्धव यांनी सरकारकडं केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काल झालेल्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उद्धव यांनी बगल दिली. 'फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व अन्य अनेक प्रश्नावर चर्चा झाली. मात्र, या सगळ्या गोष्टींवर नंतर बोलता येईल. युती, निवडणुका हे चालूच राहील. पण पाकिस्तानला सोडू नका,' असं ते म्हणाले.

फोटो - http://v.duta.us/Bx9MTQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/WjR1qwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬