[nagpur] - गडकरी नव्हे, मोदीच पंतप्रधानः रामदास आठवले

  |   Nagpurnews

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

'येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मिळतील आणि सद्यस्थितीत तेच पंतप्रधान होतील', असा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. तसेच केंद्रीय मंत्री यांची शक्यता फेटाळून लावली.

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी की नितीन गडकरी, असे विचारले असता, 'नितीन गडकरी माझे चांगले मित्र आणि अतिशय 'अॅक्टिव्ह' मंत्री आहेत. मिळालेल्या खात्याचे त्यांनी सोने केले. तथापि, सद्यस्थितीत नरेंद्र मोदीच परत पंतप्रधान होतील. गडकरी २०२४ साली पंतप्रधान होऊ शकतात', असे आठवले म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मतविभाजनाद्वारे भाजपला अप्रत्यक्ष लाभ पोहोचवण्याऐवजी थेट महायुतीत सहभागी होऊन सत्तेचा लाभ घ्यावा, असा खोचक सल्लाही आठवले यांनी आघाडीचे प्रणेते व भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना दिला. अप्रत्यक्षपणे मतांचे विभाजन टाळून थेट युतीत आल्यास दोन-तीनजणांना मंत्री होता येईल. आमच्यासोबत आल्यास त्यांना सत्तेचा मार्ग मिळेल. काँग्रेस आघाडीसोबत गेले तरी, वंचितला फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/_1o9KgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mJ4BowAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬