[nagpur] - डॉक्टरांची कार्यशाळा घ्यावी

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंगनिदान तंत्र कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी असलेल्या दक्षता पथकाच्यावतीने नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच शहरातील डॉक्टरांची आयएमएच्या सहकार्याने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. यात दक्षता समितीचे कार्य आणि डॉक्टरांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे आणि व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिली.

गर्भधारणा व प्रसवपूर्व लिंगनिदान तंत्र कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या दक्षता पथक समितीची बैठक बुधवारी घेण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत एकूण ६०६ सोनोग्राफी केंद्र असून त्यापैकी ३७६ सुरू आहेत. १० केंद्र तात्पुरते बंद असून २२० केंद्र बंद असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी यावेळी सोनोग्राफी केंद्रांना देण्यात येणाऱ्या आकस्मिक भेटीदरम्यान आढळून आलेल्या त्रुट्यांबाबत त्यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसचा आढावा घेतला. डॉ. भावना सोनकुसळे यांनी याबाबत माहिती दिली. पीसीपीएनडीटीतर्फे 'बेटी बचाओ' या विषयांवर कार्यशाळा राबविण्यात आल्याचे सांगितले. अन्य उपक्रमांचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. सल्लागार समितीच्या अध्यक्षा डॉ. वर्षा ढवळे यांनी यावेळी रुग्णालयांना नोंदणी नूतनीकरणासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात माहिती दिली. ही प्रक्रिया सोपी झाल्यास शहरातील डॉक्टरांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावर अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी, तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया कशी सोपी करता येईल. त्याचबरोबर यासंदर्भात तातडीने अहवाल तयार करण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. अन्य विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uwAY_QAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬