[nagpur] - ताडोबात बिबट मृतावस्थेत आढळला

  |   Nagpurnews

म.टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये भामनगाव येथे गुरुवारी सकाळी बिबट मृतावस्थेत आढळला. वाघाशी झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा व पळसगाव वनपरिक्षेत्राच्या सीमेवर गुरुवारी फायर लाइनचे काम सुरू होते. त्यावेळी भामनगाव येथे बिबट मृतावस्थेत आढळला. सदर घटना समोर येताच घटनास्थळी ताबडतोब ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. पूर्ण विकसित या नर बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याने शिकारीची शक्यता सूत्रांनी फेटाळून लावली. शवविच्छेदन डॉ. पोडशेलवार यांनी केले. यावेळी ताडोबा कोअरचे उपसंचालक नानासाहेब लडकत, सहायक वनसंरक्षक महेश कोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे प्रामुख्याने उपस्थित होते. बिबट्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. वाघाशी झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज सूत्रांनी...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/x1goWQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬