[nagpur] - त्रिमूर्तीनगरच्या मैदानात प्रगटदिनानिमित्त कार्यक्रम

  |   Nagpurnews

म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर

त्रिमूर्तीनगरातील श्री सद्गुरू गजानन महाराज सेवाभावी मंडळातर्फे १८ ते २६ फेब्रुवारीदरम्यान प्रगटदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगटदिनानिमित्त २५ फेब्रुवारीला शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यात नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील सातशेपेक्षा अधिक दिंड्या सहभागी होतील. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार उपस्थित राहतील. २६ फेब्रुवारीला महाप्रसाद आहे.

प्रगटदिन महोत्सवाची सुरुवात सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता गणेशपूजन, मंडप स्थापनेने होईल. त्यानंतर अभिषेक, हरिपाठ होईल. १९ ते २४ फेब्रुवारीपर्यंत दररोज दुपारी चार वाजता संत श्‍यामनारायण दास महाराज (श्री अयोध्या) यांचे भागवत, रात्री आठ वाजता भजन होईल. त्यात भेंडे लेआउट येथील श्री नानोटी परिवारातर्फे भक्तिसंगीत, त्यानंतर दररोज कृष्णाई महिला भजन मंडळ पन्नासे लेआउट, प्रतापनगरातील श्री स्वरदा भजन मंडळातर्फे भजन तर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत सामूहिक पारायण, रात्री आठ वाजता त्रिमूर्तीनगरातील श्री यागेश्‍वरी भजन मंडळाचे भजन आहे. २४ फेब्रुवारीला जयताळा येथील श्रीसाई महिला भजन मंडळाचे भजन होईल. २५ फेब्रुवारीला प्रगटदिनानिमित्त श्रींचा अभिषेक व लघुरुद्र इंदूताई तलमले यांच्या परिवारातर्फे होईल. सकाळी ११ ते दुपारी एक वाजेदरम्यान धापेवाडा येथील उमेश बारापात्रे महाराज यांच्या गोपालकाल्याचे कीर्तन होईल. दुपारी चार वाजता पालखीसह शोभायात्रा काढली जाईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार उपस्थित राहतील. शोभायात्रा गजानन मंदिरातून निघून पडोळे हॉस्पिटल चौक, गोपालनगरमार्गे माटे चौक, दुर्गा मंदिर प्रतापनगर चौक, राधे मंगलम हॉलमार्गे गजानन मंदिरात पोहोचणार आहे. २६ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता महाप्रसाद आयोजित केला आहे, असे आयोजकांनी कळविले.

फोटो - http://v.duta.us/fazMuAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yuRBygAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬