[nagpur] - नद्याजोड प्रकल्प धोक्याचा

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

'नैसर्गिक साधनसंपत्ती विषम स्वरूपात आढळते…. कुठे समुद्र, कुठे खाणी, तर कुठे वन आहेत.… निसर्गता लाभलेली ही संपत्ती राजकीय सत्ता आपल्या मर्जीनुसार हवी तिथे वळविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते धोक्याचे आहे,' असे सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी नदी जोड प्रकल्पाला विरोध केला.

'वनराई फाउंडेशन'च्यावतीने ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना दिवंगत डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चिटणवीस सेंटर येथे आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याला माजी खासदार अजय संचेती, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन वनराईचे सचिव अजय पाटील यांनी केले.

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून शासनाने जिथे पाण्याची कमी आहे तिथे पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. या प्रकल्पाचा उद्देश चांगला असला तरी ही धोक्याची घंटा आहे. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीनुसार मानवाने वस्ती निर्माण केली. माणसे आहे तिथे नद्या नेणे पुढील काळासाठी मोठे संकट ठरू शकते. या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा गैरवापरही होऊ शकतो. पाणी वाटपाचे निर्णय राजकीय नेते घ्यायला लागतात, तेव्हा प्रांता-प्रांतात वाद निर्माण होत असल्याची उदाहरणे असल्याचे डॉ. बंग म्हणाले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/J8Pa3gAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬