[nagpur] - पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

  |   Nagpurnews

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होणार असून ते दोन जाहीर सभांनादेखील संबोधित करणार आहेत.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांचे नागपूरला आगमन होणार असून ते हेलिकॉप्टरने पांढरकवड्याला रवाना होतील. नांदेड येथील एकलव्य आदर्श विद्यालयाचे उद्घाटन आणि नागपूर-पुणे ट्रेनला व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. त्याशिवाय ते महिला स्वयंसहायता समूहातील सदस्यांना प्रमाणपत्र व धनादेश देणार आहेत. यातील सुमारे २५ महिलांशी ते प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

पांढरकवडा येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी जळगावला रवाना होणार आहेत. धुळे येथे लोअर पंजारा मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना आणि अमृत योजनेचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. धुळे-मनमाड रेल्वे मार्ग आणि जळगाव-मनमाड या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत. भुसावळ-वांद्रे एक्सप्रेस ट्रेनला ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवतील. जळगाव-उधना दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असणार आहेत.

फोटो - http://v.duta.us/jAktOQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pUj7_gAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬