[nagpur] - ‘पुलवामा’चा घेतला जाईल बदला: सरसंघचालक

  |   Nagpurnews

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

'जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा बदला निश्चितपणे घेतला जाईल. हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांना सरकारकडून जशास तसे उत्तर दिले जाईल', असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी नागपुरात व्यक्त केला. सरसंघचालकांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. हल्ल्याचा बदला घेतला गेला पाहिजे, ही सर्व देशवासीयांची भावना असल्याचेही ते म्हणाले.

श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम), बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्याच्या राजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी मंचावर देवनाथ पीठाचे आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, रघुजी राजे भोसले (पंचम), मुधोजी राजे भोसले, कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मीकांत देशपांडे व ठाकूर किशोरसिंह बैस उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/hY6SpwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/j43qlQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬