[nagpur] - मनपाच्या जागांवरील दारू दुकानांवर कारवाई

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

नागपूर मनपाच्या जागेचा दुरूपयोग करून त्याठिकाणी दारूचे व्यवसाय चालत असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या विधी समितीने यापुढे महापालिकेच्या जागांचा वापर दारू विक्रीसाठी होऊ नये, यासाठी या दुकानांवर तातडीची बंदी आणण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या जागेचा दुरूपयोग करून या ठिकाणी दारूचे व्यवसाय चालत असल्याबाबतच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारती, संकुल तसेच भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमध्ये दारूचा व्यवसाय चालत असल्याने नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा व असामाजिक तत्त्वाच्या कार्यवाहीवर आळा घालता यावा, यासाठी मनपाच्या मालकीच्या इमारती, संकुल तसेच भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमधील दारूव्यवसायांवर बंदी लादण्याची शिफारस विशेष आमंत्रित व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आली. नागपूर मनपाच्या जागांवर यापुढे दारू विक्री होऊ नये, यासाठी या दुकानांवर तातडीने बंदीची कार्यवाही करा, असेही विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी यावेळी निर्देशित केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_8GsDQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬