[nagpur] - pulwama attack: पुलवामा हल्ल्यात बुलडाण्याचे २ सुपुत्र शहीद

  |   Nagpurnews

बुलडाणा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन सुपुत्रांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने या दोन जवानांसदर्भात अधिकृत दुजोरा दिलेला नाही. संजय राजपूत आणि नितीन राठोड अशी शहीद जवानांची नावे आहेत असे समजते. राजपूत हे मलकापूरचे, तर राठोड हे लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावचे सुपुत्र आहेत. या वृत्ताने बुलडाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

चोरपांग्रा या गावात नितीन राठोड नावाच्या दोन व्यक्ती असून दोघेही सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. या कारणामुळे चोरप्रांग्रा गावात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. मलकापूरचे सुपुत्र संजय राजपूत यांच्या बंधूंना ते देशासाठी कामी आल्याची माहिती मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तरी देखील याबाबत अधिकृत माहिती हाती आली नसल्याने अद्याप राजपूत यांची आई आणि पत्नीला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही....

फोटो - http://v.duta.us/aZOqqQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mwz4kQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬