[nashik] - आदिवासी शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने त्वरित निकाली काढावेत, नाशिकच्या पश्चिम भागातून समुद्राला मिळणारे पावसाचे पाणी पूर्वेच्या दुष्काळी भागाकडे वळवावे, वनदावे निकाली काढावेत आदी मागण्यांसाठी विधानभवनावर २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार जे. पी. गावित यांनी आज दिली.

शेतकरी कर्जमाफी, वनदावे आदी प्रश्न संपूर्ण राज्याचे आहेत. मला याप्रश्नी राजकारण करायचे नाही, प्रश्न मार्गी लागावेत हीच इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांसमेवत १७ फेब्रुवारी रोजी आमची बैठक आहे. त्यापूर्वी प्रश्न सुटले तर मोर्चाची वेळच येणार नाही, असे ते म्हणाले.

वनजमिनींचे दावे, शेतकरी कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी, शेतकऱ्यांनी यापूर्वी ६ ते १२ मार्चदरम्यान लाँग मार्च काढला होता. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांत अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. विधानसभेच्या पटलावरही हा विषय ठेवला होता. अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे पुन्हा लाँग मार्चचा निर्णय घेतल्याचे गावित यांनी सांगितले. नाशिकरोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गावित यांची महसूल आयुक्त राजाराम माने यांच्यासमेवत आज सायंकाळी प्रदीर्घ बैठक झाली.

फोटो - http://v.duta.us/r8c2XAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fmEyoQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬