[nashik] - जळगावची विमानसेवा मे पासून

  |   Nashiknews

जळगाव आवृत्तीसाठी

मटा विशेष

जळगावची विमानसेवा मे पासून

अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव सेवा सुरू होणार

Twitter - @BhaveshBMT

नाशिक - येत्या मे महिन्यापासून जळगाव येथून ट्रुजेट कंपनीची अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव या दोन सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिकमधून सेवा सुरू केल्यानंतर आता कंपनीने जळगावहून सेवा सुरू करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

ट्रुजेट कंपनीकडे सध्या पाच एटीआर विमाने आहेत. त्यांच्याद्वारे विविध प्रकारच्या सेवा दिल्या जात आहेत. जळगाव ते अहमदाबाद हा मार्ग उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कंपनीला मिळाला आहे. सद्यस्थितीत कंपनीकडे विमान उपलब्ध नसल्याने ही सेवा सुरू करता आलेली नाही. कंपनीकडून आणखी दोन विमानांची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही विमाने आणि त्यासोबत आवश्यक कर्मचारी यांची उपलब्धता लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. येत्या एक-दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन मे महिन्यापासून जळगाव येथून सेवा सुरू करण्याची आमची इच्छा आहे, अशी माहिती कंपनीची सीईओ नैमिष जोशी यांनी 'मटा'शी बोलताना दिली. जळगाव येथून आम्ही अहमदाबाद, बेळगाव आणि पुणे या तीन सेवा सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आम्ही नियोजन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Tgd-AgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬