[nashik] - त्र्यंबकरोडला तरुणांचा विद्यार्थिनीवर हल्ला

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्हॅलेंटाइन डे शहरात साजरा होत असताना त्र्यंबकरोडला तरुणांकडून एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या हल्ल्यामुळे दहशत पसरली आहे. त्र्यंबकरोड परिसरातील संदीप फाउंडेशन शिक्षणसंस्थेसमोर गुरुवारी सायंकाळी एका विद्यार्थिनीवर गाडीवरून आलेल्या तरुणांनी हा हल्ला केला.

चेहऱ्याला स्कार्फ बांधलेली सदर तरुणी बसची वाट बघत असतानाच त्र्यंबकेश्वरच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिच्याजवळ गाडी उभी केली. एकाने गाडीवरून उतरून तरुणीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केला. यानंतर ते दोघे गाडीवरून फरार झाले. ही घटना बघणाऱ्या नागरिकांनी त्वरित अॅम्ब्युलन्स बोलावून तरुणीस दवाखान्यात दाखल केले. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. यानंतर नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

..

\Bविद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात\B

मागील काही महिन्यांपासून त्र्यंबकरोड हा अपघातामुळे आणि विद्यार्थी सुरक्षेमुळे अधिक चर्चेत राहिला आहे. यापूर्वी याठिकाणी विद्यार्थ्यांचा आणि परराज्यातील भाविकांचा अपघातात मृत्यू झाला होता. विद्यार्थी सुरक्षा हा येथील चर्चेचा मुद्दा ठरला आहे. परिसरातील वाढती गुन्हेगारी, रहदारी आणि विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेता या ठिकाणी पोलिस चौकी, कायमस्वरूपी पोलिस नियुक्तीची मागणी होत आहे. परंतु, पोलिस प्रशासन या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याची विद्यार्थ्यांची खंत आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/8Xz4JgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬