[nashik] - पुढाऱ्याची भूमिकाआजपर्यंत करतोय

  |   Nashiknews

मंत्री महाजनांनी दिला आठवणींना उजाळा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महाविद्यालयात असताना नाटकात महिला पात्रांच्या भूमिका मिळायच्या. एकदा पुरुष पात्र मिळाल्यावर पुढाऱ्याची भूमिका मिळाली. ती भूमिका आजतयागत निभावत आहे, अशा शब्दात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आज आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी ज्योतिषावर विश्वास न ठेवता परिश्रम करा आणि व्यसनापासून दूर राहा असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला गुरुवारी १४ फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या प्रांगणात प्रारंभ झाला. सायंकाळी या महोत्सवाचे उद्घाटन गिरीष महाजन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील होते. यावेळी मंचावर आमदार राजूमामा भोळे, प्र-कुलगुरु प्रा.पी. पी. माहुलीकर, महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्य.प.सदस्य दिलीप पाटील उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Ha2oEgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬