[nashik] - प्रामाणिकतेवर डाग, पित्याने पत्करला आत्महत्येचा मार्ग!

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इमानइतबारे कष्ट करून जपलेला विश्वास एका चोरीच्या घटनेने मातीस मिळाला. हा विश्वासघात सुद्धा पोटच्या मुलाकडूनच झाला. एकीकडे विश्वास ठेवणारे कुटुंब, तर दुसरीकडे रक्ताचे नाते! कुटुंब, कर्तव्य आणि आत्मसन्मान अशा भावनांच्या कात्रीत सापडलेल्या पित्याने अखेर जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या व्यक्तीच्या आत्महत्येप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

श्रीपत उर्फ बंडू तुकाराम म्हस्के (वय ५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. म्हस्के गेल्या सात ते आठ वर्षांपासून कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून कामास होते. महिनाभरापूर्वी पाटील यांच्या बंगल्यातून म्हस्के यांच्या धाकट्या अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. चोरीची घटना आणि त्यातील मुलाचा सहभाग असल्याचे समजल्याने म्हस्के व्यथित झाले. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. मुलाच्या प्रतापाची माहिती मिळताच मंगळवारी (दि.१३) म्हस्के घराबाहेर पडले. भगूर येथे त्यांच्या मुलीचे सासर असल्याने त्यांनी भगूर गाठले. भगूर बस स्थानक परिसरात जाऊन त्यांनी विषारी औषध सेवन केले. काही वेळातच ते जमिनीवर कोसळले. नागरिकांनी नजीकच्या पोलिस चौकीमधील कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी म्हस्के यांच्या ताब्यात मिळालेल्या मोबाइलद्वारे नातेवाईकांशी संपर्क साधला. तसेच, अत्यवस्थ झालेल्या म्हस्के यांना देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. जावई अनिल गंगाधर हतांगळे यांनी त्यांची ओळख पटविली असून, मृत म्हस्के यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली....

फोटो - http://v.duta.us/HzfDSAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kzobZQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬