[nashik] - मैत्रिणीशी बोलल्याने मित्रावरच हल्ला

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मैत्रिणीशी फोनवरून बोलल्याचा राग आल्याने एकत्र व्यवसाय करणाऱ्या मित्राने दुसऱ्यावर मित्रांच्या मदतीने हल्ला करून जखामी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान जेलरोडच्या शिवाजीनगर रिक्षा स्टँडवर घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात जखमी अतुल मुठाळ (रा. साई विमल अपार्टमेंट, शिवाजीनर, जेलरोड) याने फिर्याद दिली. त्यावरून आकाश खंदारे आणि कृष्णा (रा. लोखंडे मळा, उपनगर) या दोघांविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

आकाश हा अतुलसोबत इलेक्ट्रिक वस्तूंचे मार्केटिंगचे काम करतो. त्यांच्यासोबत संतोष खुल्लम हा देखील काम करतो. आकाशने बुधवारी (दि. १३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मैत्रिणीशी फोनवरून बोलत असल्याची कुरापत काढून अतुलशी शिवाजीनगर रिक्षा स्टॉपवर वाद उकरुन काढला आणि कृष्णाच्या मदतीने अतुलवर हल्ला केला. यावेळी कृष्णाने अतुलला धरून ठेवले तर आकाशने अतुलच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. यात अतुल गंभीर जखमी झाला. यावेळी स्थानिक नागरिक जमा झाल्याने दोघे हल्लेखोर पळून गेले. जखमी अतुलला उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/V9fSEQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬