[nashik] - युवक काँग्रेसचे ‘चलो पंचायत अभियान’

  |   Nashiknews

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा थेट जनतेच्या दरबारात पंचनामा करण्याबरोबर आणि भविष्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास युवक, शेतकरी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती धोरणे राबविणार याची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे राज्यभरात 'चलो पंचायत अभियान' राबविले जाणार आहे. जिल्ह्यात १० हजार बेरोजगारांची नोंदणी करण्याचे नियोजन असल्याची माहितीही जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अभियानाद्वारे गाव आणि शहरांना थेट काँग्रेस पक्षासोबत जोडण्याचा उपक्रम आहे. भाजपबाबत जनतेच्या मनात जे दुःख व रोष आहे, ते समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जनसंपर्क करीत आहेत. या अभियानात शहरात तीनशे युवक काँग्रेस समन्वयक कार्यरत आहेत. प्रत्येक ठिकाणी युवक काँग्रेसची शाखा सुरू करणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून युवक काँग्रेसतर्फे पाच कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात युवकांसोबत संवाद साधून मोदी आणि फडणवीस सरकारकडून झालेली फसवणूक, फसलेल्या आर्थिक नीती आणि दोन कोटी रोजगारांचे खोटे आश्वासन या बाबी युवकांच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत, असे पाटील यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/hNlffQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/VNDaFwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬