[nashik] - विद्यार्थ्यांना मातृभाषेतून द्या शिक्षण

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी भाषा टिकविण्यासाठी प्रत्येकाने मातृभाषेतच शिक्षण घेणे अतिशय गरजेचे आहे. शिक्षण संस्थानीही यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने मातृभाषेतच शिक्षण देण्याचा उत्तम प्रयत्न केल्यास प्रत्येकाला सर्व भाषांवर प्रभुत्व मिळवता येईल, असा विश्वास विद्या भारतीचे भाई उपाले यांनी व्यक्त केला.

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिशुवृंद शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'बालशिक्षणासाठी मराठी माध्यमाचे महत्त्व', या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र झाले. यावेळी उपाले बोलत होते. यावेळी त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण देणे, पालक प्रबोधन करणे, शिक्षकांना नवनवीन प्रशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाच्या शिशुवृंद शाळेने ५० वर्षे यशस्वीपणे पूर्ण केले ही बाब संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची आहे, असे गौरवोद्गारही काढले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/LCUA4gAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬