[nashik] - वाहतूक नियमांचा रस्त्यावर ‘न्याय’!

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहतूक नियमांची पायमल्ली होणे आणि पोलिसांनी कारवाई करणे, हे चित्र नवीन नाही. अनेकदा पोलिसांच्या कारवाईनंतर बाचाबाची होते. प्रकरण हाताघाईवर सुद्धा येते. असाच एक प्रसंग गुरुवारी कोर्टासमोर सर्वांनी अनुभवला. पण, येथे कोणी सर्वसामान्य नागरिक नव्हते. तर, कायद्याचे पालन योग्य झाले की नाही, हे लक्षात घेऊन न्याय देणारी व्यक्ती होती. पोलिसांनी संबंधितावर दंडात्मक कारवाई केली. पण, हा प्रश्न मोठेपणाने संपेल की त्याला पदाची हवापाणी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

कोर्टातील पार्किंग आणि कोर्टासमोरील रस्ता, हा विषय सर्वांनाचा त्रासदायक. अगदी पिचलेला पक्षकार असो की प्रलंबित खटल्याच्या संख्येखाली दडलेली न्यायपालिका! प्रत्येकालाच या दिव्यातून जावे लागते. त्यातच स्मार्ट रस्त्याने ही भळभळ आणखी वाढवली. आज, गुरुवारी कोर्टातील पार्किंगबाबत नवीन नियम लागू झाले. त्यामुळे येथे अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. यातील काही पोलिस मेहर सिग्नल येथे उभे होते. मेहर सिग्नलकडून सीबीएसकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पोलिस नसताना हा नियम कोणीही पाळत नाही, हा भाग अलहिदा! बऱ्याचदा नियम मोडणे इतके अंगवळणी पडते की नियमांचे पालन करणे हा अत्याचार वाटू लागतो. आज सुद्धा अनेक वाहनचालकांची हीच प्रतिक्रिया होती. त्यात कोर्टात निघालेल्या आणि न्यायपालिकेतील उच्चपद असलेल्या व्यक्तीस पोलिसांनी थांबविले. सहाजिकच वाहनातील व्यक्तीचा पारा चढला. पोलिसाला दोन-चार शब्द सुनावत चालक वाहन पुढे निघून गेले. पोलिसांनी वाहनाचा फोटो काढलाच होता. त्यानुसार दंडाची नोटीस बजाविण्याचा कार्यक्रम पार पडला. वादाचा पहिला अंक संपला. न्याय-अन्यायाचा निवडा करण्याची कायदेशीर ताकद ठेवणारी ही व्यक्ती मोठेपणाने दंड भरून आपण कायद्यापेक्षा मोठे नाही, हे दाखवून देईल की दंड केला म्हणून पोलिसांशी थेट पंगा घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....

फोटो - http://v.duta.us/3rzxqgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6OZAiwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬