[nashik] - शहराला होर्डिंग्जचा विळखा

  |   Nashiknews

न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

.....

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना होर्डिंग्जने मात्र शहराचे विद्रूपीकरण होत आहे. निवडणुका जवळ आल्याने सोम्या गोम्यांनाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाऊ, नाना, दादा यांनी तर शहरातल्या प्रत्येक भागात, होर्डिंग स्वरुपात आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे.

शुभेच्छा, वाढदिवस, आधारकार्ड असे काहीही निमित्त काढून अनेकांनी या काळात चमकोगिरी सुरू केली आहे. प्रत्येक चौकातील कारंजे, मुख्य चौक महापालिकेच्या जागासुध्दा होर्डिंग लावणाऱ्यांनी सोडल्या नसल्याचे चित्र दिसते आहे. महापालिकेने होर्डिंगसाठी जागा निश्चित केल्या असून, त्या जागेवर होर्डिंग लाऊनही, मिळेल त्या जागेवर होर्डिंग लावण्याचा सपाटा लावला आहे. शहरात मनपातर्फे उभारण्यात आलेल्या कमानींवर प्रमुख राजकीय पुढाऱ्यांनीच अतिक्रमण केल्याने झाकाळून गेल्या आहेत. मनपा प्रशासन झोपेतून केव्हा जागे होणार असा सवाल जनतेला पडला आहे. मनपाने तातडीने या विभागात कारवाई करून शहर होर्डिंगमुक्त करावे, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wMFsbgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬