[navi-mumbai] - आरोग्य केंद्राचे उद्घाटन

  |   Navi-Mumbainews

नवी मुंबई : खासगी आरोग्य सेवेद्वारे करण्यात येणारे उपचार हे बहुतांशी सर्वसामान्यांना परवडणारे नसल्यामुळे सिडकोच्यावतीने उलवे नोडमध्ये उभारण्यात आलेल्या नागरी केंद्रामुळे सर्वसामान्यांना माफक दरातील परंतु दर्जेदार उपचारांची हमी मिळेल, असे उद्गार सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी काढले. बुधवारी उलवे नोड येथील सिडकोच्या नवीन जागेत स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरी आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

चित्रपट महोत्सव

नवी मुंबई : सिडकोच्या वतीने फिल्म डिव्हिजन मुंबई यांच्या सहकार्याने १२ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत अर्बन हाट येथे चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात फिल्मस डिव्हिजन मुंबई, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार निर्मित विविध भाषांतील १० माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. हे माहितीपट इंग्रजी, हिंदी व बंगाली भाषेत असतील. विविध विषयांवर आधारित असणारे हे चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शक ठरतील. सायंकाळी ८ ते ९ या वेळेत ते प्रदर्शित करण्यात येणार आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/TTtkPAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬