[navi-mumbai] - एनएमएमटीचे अंदाजपत्रक ३३३ कोटींच्या घरात

  |   Navi-Mumbainews

परिवहन समितीने २७ कोटींची वाढ सुचवून दिली मंजुरी

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई महापालिका परिवहन व्यवस्थापनाने (एनएमएमटी) आगामी आर्थिक वर्ष सन २०१९-२०साठी सादर केलेल्या ३०५ कोटी ८५ लाख १५ हजार रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकात परिवहन समिती सदस्यांनी २७ कोटी ४१ लाखांची वाढ करत ३३३ कोटी २६ लाख १५ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे.

एनएमएमटी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी परिवहन सेवेचा सन २०१८-१९च्या सुधारित अंदाजपत्रकासह सन २०१९-२०साठीचा मूळ अर्थसंकल्प परिवहन समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. परिवहन व्यवस्थापनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर बुधवारी परिवहन समितीची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी परिवहन व्यवस्थापनाने सन २०१८-१९चे सुधारित अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने परिवहन उपक्रमासाठी मंजूर केलेले ३४६ कोटी ८१ लाख ७४ हजारांचे उद्दिष्ट साध्य करताना एनएमएमटी व्यवस्थापनाने प्रवासी मिळवण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांमध्ये सुरू असलेली स्पर्धा, शहरात सुरू असलेल्या नागरी विकासकामांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, वर्षभरात प्रवासीसंख्येत झालेली घट, सीएनजीचे देयक, डिझेल दरवाढ, सुट्टे भाग खरेदी आणि आस्थापनांवरील खर्चात झालेली वाढ यामुळे चालू आर्थिक वर्ष अखेरीस २७२ कोटी ६५ लाख १८ हजार एवढी जमा आणि २७२ कोटी ५८ लाख २२ हजार खर्च वजा करता वर्षअखेर ६ लाख १९ हजार शिल्लक रक्कम राहणार असल्याचे म्हटले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Pf2wAAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬