[navi-mumbai] - कामोठेतून अकरा बांगलादेशी घुसखोरांना अटक

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

कामोठेतील मोठा खांदा परिसरात बेकायदा वास्त्यव्यास असलेल्या आणखी अकरा घुसखोर बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या आय शाखेने मंगळवारी पहाटे अटक केली. यात चार महिला, सहा पुरुष तसेच एका लहान मुलीचा समावेश आहे. हे सर्वजण गेल्या वर्षभरापासून या भागात मोलमजुरी, घरकाम करून राहत होते.

गेल्या आठवड्यातदेखील मुंबई पोलिसांच्या आय शाखेने जुई कामोठे भागात रहाणाऱ्या तीन घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. कामोठेतील मोठा खांदा भागात आणखी काही घुसखोर बांगलादेशी नागरिक बेकायदा राहत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेला मिळाली होती. त्यानुसार आय शाखेने मंगळवारी पहाटे कामोठे पोलिसांच्या मदतीने मोठा खांदा परिसरात विविध ठिकाणी छापे मारले. यावेळी सेक्टर-१४ मधील जनार्नद गोवारी चाळीत मनिरुल नझरुल मंडल (३२), शकीला मनिरुल मंडल (३०), सेक्टर-१५ मधील साई रेसीडेन्सीमध्ये सलिम फुका शेख (४२), रेश्मा रौफ सरदार (२४), सेलेना बाबु शेख (३५), तसेच सेलेनाची ३ वर्षीय मुलगी सोमी बाबुल शेख हे सहा जण राहत असल्याचे आढळुन आले. मोठा खांदा गावातील माधव भगत चाळीत बाबुल लुकमान शेख (४५), सीताबाई धुधरेकर चाळीत बबलू मझसिल सिकंदर (३८), तसेच नवाज समिर शेख (२०), तर अंकुश धर्मा भगत चाळीत मनुरा इरफान गाझी (५०), शहानारा तरीकुल शेख (३०) हे पाच जण राहत असल्याचे आढळून आले. या सर्वांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली असता, भारतीय नागरिक असल्याबाबतचे कोणतेही पुरावे ते सादर करू शकले नाहीत. अधिक चौकशीत सगळ्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. बांगलादेशातील गरिबीला कंटाळून रोजगारासाठी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. या सर्वांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात पासपोर्ट अधिनियम, तसेच परिकय नागरी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे....

फोटो - http://v.duta.us/ukycBQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fptpegAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬