[navi-mumbai] - पगारी पुजारी वदासाठी २५२ पैकी ७२ अर्ज पात्र

  |   Navi-Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी मागवण्यात आलेल्या २५२ अर्जांपैकी छाननी प्रक्रियेत ७२ अर्ज पात्र ठरले. २० व २१ फेब्रुवारी रोजी त्र्यंबोली भक्त निवास येथे पगारी पुजारी नियुक्तीसाठी मुलाखत घेण्यात येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत या मुलाखती होतील.

पगारी पुजारी कायद्याच्या मसुद्यानुसार अंबाबाई मंदिरात पुजारी नियुक्ती प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्याच्या विधी व न्याय मंत्रालयाकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे आले आहेत. त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पगारी पुजारी पदासाठी पात्रतेच्या निकषानुसार ७२ अर्ज पात्र ठरवण्यात आले आहेत. दाखल झालेल्या अर्जांमध्ये २५ महिलांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, जून २०१७ मध्येही पगारी पुजारीपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मात्र ही प्रक्रिया अधिकृत नसल्याचा आरोप झाल्यामुळे रद्द ठरवण्यात आली होती.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vq6ZggAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬