[navi-mumbai] - पशुवैद्यकीय रुग्णालयाला मुहूर्त

  |   Navi-Mumbainews

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना होऊन २५ वर्षांहून अधिक काळ लोटल्यावर अखेर आता पालिकेला प्राण्यांचे रुग्णालय उभारण्याचा मुहूर्त सापडला आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी पालिकेच्या वतीने दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र जागेची अडचण आणि नागरिकांचा सतत होणारा विरोध, यामुळे प्राण्यांसाठीच्या रुग्णालयाची वीट पालिकेला रचता आली नाही. अखेर रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला असून जुईनगरमध्ये सेक्टर २४मध्ये हे रुग्णालय उभारले जात आहे.

नेरूळ विभागातील जुईनगर से. २४मधील भूखंड क्र. ५ व ६ येथे पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्यासाठी सिडकोकडून ९२०.७७४ चौमी एवढ्या क्षेत्रफळाचा भूखंड महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेला आहे. या भूखंडावर पशुपक्षी यांची चिकित्सा व उपचार करण्यासाठी अद्ययावत स्वरुपाचे पशुवैद्यकीय रुग्णालय महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत आहे. गुरुवारी या कामाचे भूमिपूजन महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन मजली पशुवैद्यकीय रुग्णालय इमारतीत ११ हजार चौरस फुटाचे आरसीसी बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी साधारण ५ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. यावेळी सभागृह नेते रवींद्र इथापे, नगरसेवक रंगनाथ औटी, विशाल ससाणे, मुख्य अभियता सुरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Ba0KwgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬