[navi-mumbai] - भूखंड एकत्रिकरणाची संधी

  |   Navi-Mumbainews

प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांची सिडको पूर्तता करणार

मनोज जालनावाला, नवी मुंबई

विमानतळबाधितांना साडेबावीस टक्के पुनर्वसन योजनेअंतर्गत पुष्पक नगर येथील विविध क्षेत्रांत देण्यात आलेल्या भूखंडांचे एकत्रिकरण करून विकास करता येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सिडकोने तयार केला असून सोमवारी होणाऱ्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर मंजुरीची मोहर उमटणार आहे. भूखंडाचे एकत्रिकरण करण्याच्या या प्रस्तावामुळे प्रकल्पग्रस्तांना भूखंडाच्या क्षेत्रफळाचा अधिक लाभ मिळणार असून मोठ्या क्षेत्रफळाचे भूखंड विकसित झाल्यास पुष्पकनगर क्षेत्राचा विकासदेखील नियोजनबद्ध रितीने होऊ शकणार आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेच्या मोबदल्यात पुष्पकनगर येथे २२.५ टक्के योजनेअंतर्गत ७ नोड्समध्ये भूखंड देण्यात आले आहेत. तसेच स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांतील ग्रामस्थांना पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत मूळ घरांच्या तिप्पट क्षेत्रफळाचे भूखंड देण्यात आले आहेत. अनेकांनी या भूखंडांवर विकासकामेही सुरू केली आहेत. ही विकासकामे सुरू असताना काही प्रकल्पग्रस्तांनी सिडकोकडे लगतच्या भूखंडांचे एकत्रिकरण करण्यास परवानगी मागितली. परंतु सिडकोच्या प्लानिंग विभागाने विमानतळक्षेत्रातील भूखंडाचे भिन्न मालक असल्याने एकत्रिकरण होऊ शकत नसल्याचे सांगत प्रस्ताव फेटाळले. त्याकरिता प्लानिंग विभागाने १२ जानेवारी २०१७च्या संचालक मंडळाच्या बैठकीत भूखंड एकत्रिकरणाचा मंजूर केलेल्या ठरावाचा आधार घेतला. या ठरावात लगतचे भूखंड एकाच व्यक्तीच्या अथवा संस्थेच्या नावे असल्यास त्या भूखंडांचे एकत्रिकरण होऊ शकते, असे नमूद केले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yrQI_AAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬