[pune] - ‘अण्णा भाऊ साठे स्मारक समितीला पुरेसा निधी द्या’

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारक समितीला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. स्मारकाचे काम विकसकाऐवजी सरकारने स्वतः करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समितीचे सचिव राज्यमंत्री मधुकर कांबळे यांच्या उपस्थितीत मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ऐतिहासिक स्मारकाचे काम त्वरित चालू करावे, अशी मागणी गोरखे यांनी केली. अण्णा भाऊंच्या जयंती महोत्सवाला सरकारने शंभर कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, पुण्यातील क्रांतिवीर लहुजी स्मारक समितीसाठी जमीन हस्तांतरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि सरकारी कार्यालय पुणे येथे चालू करावे, साहित्य प्रकाशन समिती पुनर्स्थापित करून पुढील साहित्य त्वरित छपाई करावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

या समितीला त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, स्मारकाचे काम विकसकाऐवजी स्वतः बांधकाम विभागाने करावे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीसाठी आरक्षित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया त्वरित राबवून मूळ मालकांना त्यांचा परतावा द्यावा, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_kk-TQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬