[pune] - आचारसंहितेआधी होणार शिक्षक भरती

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया दहा ते बारा हजार जागांसाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सुरू होईल,' असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र"फडणवीस यांनी शिक्षक भरती सुरू होण्यासाठी उपोषण करणाऱ्या उमेदवारांना दिले आहे. शिक्षक भरतीबाबत शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्याशी समन्वय साधून योग्य कारवाई करण्यात येईल,' असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात २४ हजार जागांसाठी शिक्षक भरती सुरू व्हावी, यासाठी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू होते. या उपोषणादरम्यान पालक मंत्री गिरीश बापट यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. या वेळी बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून चर्चा घडवण्याचे देण्याचे आश्वासन उपोषणकर्त्या उमेदवारांना दिले होते. त्यानुसार उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी मंत्रालयात भेटले. शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने शिक्षक भरती रखडली असल्याचा आरोप उमेदवारांनी केला. या वेळी फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभागांच्या सचिवांशी ताळमेळ घालून शिक्षक भरती राबविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे उमेदवारांनी सांगितले. शिक्षक भरतीसाठी पुढील आंदोलन २० फेब्रुवारीपासून ग्रामविकास विभागाच्या विरोधात मुंबईत आझाद मैदानात करण्यात येईल, असे उमेदवारांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/dj79HwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬