[pune] - आणखी पाच साखर कारखान्यांना नोटीसा

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

ऊस उत्पादन शेतकऱ्यांची रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) थकबाकी असलेल्या ३९ साखर कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशानंतर साखर आयुक्तालयाने आणखी पाच कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यासह नगरमधील जय श्रीराम साखर कारखाना आणि केदारेश्वर साखर कारखाना, सोलापूरमधील मकाई साखर कारखाना आणि आंबेजोगाई साखर कारखाना यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नोटिसा दिल्या आहेत.

'एफआरपी'ची थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर साखर आयुक्तांनी ३९ साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईच्या नोटिसा बजाविल्या होत्या. त्यानंतर या आणखी पाच कारखान्यांवर कारवाई झाली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/e4_XWwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬